Uncategorized

आलीशान इंग्लीश स्कुल मध्ये “उडान-१२” संस्कृतीक मोहत्सव उत्साहात

सहसंपादक शेख मुजाहिद

मुळावा येथील स्व. बापुमियाँ देशमुख महिला बहुउद्येशीय संस्था व्दारा संचालीत आलीशान इंग्लीश स्कुल मध्ये “उडान – १२” संस्कृतीक मोहत्सव २०२६ मंगळवारी दि. २७/०१/२०२६ रोजी मोठया उत्साहात पार पडला. आलीशान इंग्लीश स्कुलचे “उडान” या दरवर्षी होणाऱ्या संस्कृतीक कार्यक्रमाचे १२ वे वर्षे होते. विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देणाऱ्या या मोहत्सवात नृत्य, गायन, भाषण व देशभक्ती वरील सांस्कृतीक कार्यक्रमाने उपस्थीतांचे मने जिंकली.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. तातुभाउ देशमुख सरचिटणीस प्रदेश कॉग्रेस कमिटी माजी अर्थ व बांधकाम सभापती यवतमाळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन मा. निलेश शेंबडे साहेब, पि.एस.आय. पोफाळी पोलीस स्टेशन होते. यावेळेस डॉ. डी. एन. देशमुख माजी सरपंच, शारदा सुरेश जाधव सरपंच व संजु देशमुख उपसरपंच ग्राम पंचायत मुळावा, मा. नामदेवराव सुरोशे सर, अॅड. मोहम्मद शहेबाज, व इतर मान्यवर उपस्थीत होते. या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष व मा. निलेश शेंबडे साहेब यांनी उपस्थीत पालकांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्याच्या सादरीकरणास प्रेक्षकांकडुन टाळयांचा कडकडाट करीत भरभरुन प्रतिसाद मिळाला. लहान चिमुकल्यांनी उत्सवात भरपुर प्रमाणात सहभाग घेतला. या प्रसंगी शिक्षणा सोबतच सांस्कृतीक व नैतिक मुल्यांचे महत्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभयकुमार सुरोशे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेफुज सरांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मुख्याध्यापीका शादाब देशमुख, महेफुज अफसरमियाँ देशमुख, सानिका धनंजय सौंदनकर, प्रियंका दिपकराव गायकवाड, प्रियंका नकुल सोनटक्के, कमलाबाई चंदु जोगदंड, सुधाकर आंडगे यांचे व शिक्षकोत्तर कर्मचारी व पालकांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button