दराठी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट

- भवानी यात्रेत जुगार खुलेआम; आर्थिक देवाणघेवाणीचे गंभीर आरोप
मुख्य संपादक
िदर्भातील टोकाचे पोलीस स्टेशन म्हणून ओळख असलेल्या दराठी पोलीस स्टेशन अंतर्गत सध्या अवैध धंद्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. परिसरातील २७ गावांमध्ये अवैध व्यवसायांनी उच्चांक गाठला असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अवैध रेती वाहतूक बिनधास्त
दराठी परिसरात सध्या जवळपास २५ टँक्टर अवैध रेती वाहतूक करत असल्याची माहिती असून, ही वाहने विनापरवाना चालवली जात असल्याचे उघड झाले आहे. संबंधित रेती माफियांकडून दरमहा प्रत्येकी सुमारे १५ हजार रुपयांचा हप्ता दिला जात असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे.
अवैध दारूचे ३० अड्डे
परिसरात अवैध दारू विक्रीचे सुमारे ३० अड्डे सुरु असल्याची माहिती असून, यासाठी दरमहा सुमारे ६ हजार रुपयांचा हप्ता दिला जात असल्याचे सूत्रांकडून समजते.
जुगार, मटका व सट्ट्याचा उघड बाजार
भवानी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जुगार अड्डे खुलेआम सुरू असून, मटका काऊंटर, सट्टा व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या सर्व अवैध धंद्यांतून दराठी पोलीस स्टेशन स्तरावर आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे आरोप नागरिक व सूत्रांकडून केले जात आहेत.
नागरिकांची थेट मागणी
या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (SP) तातडीने लक्ष घालून,
अवैध रेती वाहतूक
अवैध दारू विक्री
जुगार, मटका व सट्टा अड्डे
तात्काळ बंद करावेत,
तसेच दराठी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या कथित आर्थिक साखळीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी जोरदार मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.
प्रश्न अनुत्तरित
इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असताना कारवाई का होत नाही?
भवानी यात्रेसारख्या सार्वजनिक उत्सवात जुगार खुलेआम कसा सुरू?
पोलिस यंत्रणा अपयशी की संगनमत?
हे प्रश्न आज दराठी परिसरातील नागरिक उघडपणे विचारत आहेत.



