हिमायतनगरच्या व्यापार क्षेत्रात नवी भर: माजी आमदार जवळगावकरांच्या हस्ते ‘मोरया स्टोअर्स’चे उद्घाटन

हिमायतनगर (प्रतिनिधी ता शेख खयुम खूरेशी):
शहराच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये भर घालत जाधव बंधू संचलित मोरया स्टेशनरी, जनरल स्टोअर व गिफ्ट सेंटर’ चा भव्य शुभारंभ माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती. यामध्ये नगराध्यक्ष रफिक भाई, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, माधव कदम विरसनी आणि प्रदीप शिंदे उंचगावकर यांनी हजेरी लावून जाधव बंधूंना त्यांच्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मान्यवरांनी स्थानिक स्तरावर दर्जेदार सेवा देणाऱ्या अशा व्यवसायांची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



