Uncategorized

१८ वर्षीय विद्यार्थ्याचा रहस्यमय बेपत्ता; पोफाळी पोलिसांत नोंद


सह सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड तालुक्यातील धनज गावातून १८ वर्षीय विद्यार्थ्याचा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात हरवलेली व्यक्ती म्हणून अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव संविधान नथ्थु ढोबळे (वय १८ वर्ष) असून तो धनज येथील आश्रम शाळेत इयत्ता १२वीत शिक्षण घेत आहे. संविधान हा दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला. त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.
संविधानचे वडील नथ्थु नागु ढोबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सकाळी शेतात गेले असताना दुपारी पत्नीने मुलगा घरी नसल्याचे कळवले. मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल स्विच ऑफ असल्याचे आढळून आले. नातेवाईक, शेजारी-पाजारी तसेच गावात सर्वत्र शोध घेऊनही संविधानचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.
तो मध्यम बांध्याचा, सावळ्या रंगाचा, साडे चार फूट उंचीचा असून अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, निळसर रंगाचा बरमूडा व काळ्या रंगाची सँडल घातलेली होती.
या घटनेची पोफाळी पोलीस ठाण्यात दि. १९ जानेवारी २०२६ रोजी नोंद घेण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संविधानचा कुठेही ठावठिकाणा लागल्यास तात्काळ पोफाळी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीय व पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button