जनुना जिल्हा परिषद शाळेत व्यवस्थापन समितीची निवड; अध्यक्षपदी रमेश बुरकुले तर उपाध्यक्षपदी विजय कोल्हे

उमरखेड: तालुक्यातील शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या जनुना येथील जिल्हा परिषद शाळेत पालक व्यवस्थापन समितीची निवड १७ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या निवडीमध्ये अध्यक्षपदी रमेश सदाशिव बुरकुले यांची, तर उपाध्यक्षपदी विजय प्रकाश कोल्हे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
समितीच्या सदस्यपदी विठ्ठल धुमाळे, वसंत चव्हाण, लक्ष्मण ठाकरे, गणेश जाधव (शिक्षणतज्ज्ञ), सविता गजानन ठाकरे, पुण्य रथा पंजाब मेंढे, रेश्मा राठोड, सुनीता संतोष कलाने, राणी धोंगडे आणि उषा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवनिर्वाचित समितीचे गावातील मान्यवरांनी स्वागत केले. यामध्ये गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास खोकले, सरपंच सुनीता बुरकुले, कैलास मोरे, सतीश राठोड, सुभाष चव्हाण, शंकर बुरकुले, रमेश चव्हाण, सुदाम धोंगडे आणि सतीश ठाकरे यांचा समावेश होता.
ही निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक कृष्णा पाचकोरे, दिनेश कोल्हे, शेख इसाक, शेख मुनीर, सोपान मुरकुटे, गजानन पूरी, कुंडलिक गोरे, गोपाल गिते आणि लक्ष्मण वासुदेव यांनी विशेष परिश्रम घेतले. या निवडीबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.



