Uncategorized

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कपिल बरडे यांची निवड

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, पोफाळी येथे शाळा व्यवस्थापन समितीची नव्याने रचना करण्यात आली. सर्व माता-पिता यांच्या उपस्थितीत व संमतीने ही समिती गठित करण्यात आली असून, नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांची घोषणा करण्यात आली.
या निवड प्रक्रियेत कपिल बरडे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी सौ. अल्काताई ढगे, विनायक भोजनकर, अतिक खा पठाण, संतोष बरगे, सिद्धार्थ बरडे, सुनील ठाकरे (शिक्षणप्रेमी), सौ. रमाताई कांबळे, सौ. सोनाली मांगुळकर, सौ. छायाताई शेळके, सौ. प्रतिभा हनवते यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच मा. शंकर हटेकर हे सदस्य म्हणून कार्य पाहणार आहेत.
शाळेचे शिक्षक सचिव म्हणून मा. जगदीश चंद्र दरणे (उच्च श्रेणी मुख्याध्यापक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष व सर्व सदस्यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोफाळी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व माता-पालकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
नवनियुक्त समिती शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रियपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button