१५ दिवशीय वली कामील बादशाह मियाँ जंगी ऊर्स यात्रा शांततेत संपन्न

जमादार रवि यांची उत्तम कामगिरी
सहसंपादक शेख मुजाहिद
जिल्ह्यात १५ दिवस चालणारी सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या निंगनुर येथील वली कामील बादशाह मियाँ पारंपारिक ऊर्स यात्रेला परिसरात अनन्य साधारण महत्व आहे .
पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे दि २ व ३ जानेवारी रोजी रात्री वली कामील बादशाह मियाँचा संदल दि ४ रोजी सकाळी फातीया नंतर भंडारा आणि त्यानंतर कुस्त्या , कबड्डी , शंकरपट असे १५ दिवस विविध भरगच्छ कार्यक्रमांची मेजवाणी यात्रेकरूंना मिळते . विदर्भ – मराठवाड्यातून आसपासच्या परिसरातून भाविक श्रद्धाभावनेने वली कामील बादशाह मियाँ बाबांच्या दर्शनासाठी येतात . परिसरातील गावांच्या माहेरवासीनी १५ दिवस माहेरी येऊन यात्रेचा आनंद घेतात . श्रद्धाळू महिला , पुरुष यात्रेत श्रद्धा भावनेने सहभागी होतात . प्रदिर्घ अशा १५ दिवस चालणाऱ्या यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिटरगांव पोलीसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला . ठाणेदार पांडूरंग शिंदे व त्यांचे निगंनुर बिटजमादार रवि गिते व पो.का.हिम्मत जाधव व सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी यात्रेकरूंना त्रास होणार नाही यासाठी समाज कंटक प्रवृत्तींवर करडी नजर ठेऊन होते . पोलीसांनी या हिंदु मुस्लिम एकतेच्या श्रद्धापर्वात कुठेही अवैध धंद्यांना थारा मिळू दिला. यात्रा ही अतिशय शांततेत कोणतेही गालबोट न लागू देता पार पडली म्हणून गावाकऱ्यांनी ठाणेदार पांडुरंग शिंदे बिट जमादार रवी गिते, पोलीस हिंमत जाधव, राहुल परतके, इम्रान खान याचे आभार मानले.



