Uncategorized

मुळावा–भांबरखेडा रस्त्याचे काम तीन वर्षांपासून अर्धवटच!

४ कोटी मंजूर होऊनही रस्ता अपूर्ण — नागरिकांच्या जिवाशी खेळ उमरखेड):–

सहसंपादक शेख मुजाहिद
मुळावा ते भांबरखेडा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच असून, सन २०२३ मध्ये तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही आजपर्यंत रस्ता पूर्ण झालेला नाही. काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत डिसेंबर २०२५ असताना ठेकेदार व संबंधित यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे रस्ता अद्याप अपूर्ण आहे.


या अर्धवट व निकृष्ट रस्त्यामुळे दररोज अपघातांचे सत्र सुरू असून, मुळावा व पोफाळी परिसरातील नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. खड्डेमय, अर्धवट व दर्जाहीन कामामुळे रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण ठरत आहे.
या कामामध्ये ठेकेदारांचा मनमानी व निष्काळजी कारभार स्पष्ट दिसून येत असून, निकृष्ट दर्जाच्या कामाकडे संबंधित विभागांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. इतक्या मोठ्या निधीनंतरही रस्ता अपूर्ण राहतो, याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. *बॉक्स* माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की,
“मुळावा व पोफाळी परिसरातील सर्व अर्धवट रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार व टिकाऊ रस्ते देण्यात यावेत. झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा येत्या काळात पळशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.”
प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास जनआंदोलन तीव्र होण्याची शक्यता असून, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग व ठेकेदारांवर राहील.चितांगराव कदम ,माजी जी.प.सदस्य मुळावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button