८ आठवडे उलटले तरी गुणवत्ता यादी गुलदस्त्यातच; सद्धम्म उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे कार्यरत असलेल्या अल्पसंख्याक दर्जाच्या सद्धम्म उच्च माध्यमिक (कला) विद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षक पदाच्या भरती प्रक्रियेबाबत गंभीर संभ्रम निर्माण झाला आहे. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी (शनिवार) या पूर्णवेळ रिक्त पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. ही शाळा भारती बौद्ध ज्ञानलंकार शिक्षण संस्था, मुळावा यांच्या माध्यमातून चालवली जाते.
या पदासाठी तब्बल २४ ते २५ उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थिती लावली. मात्र, मुलाखतीला आज तब्बल आठ आठवड्यांचा कालावधी उलटून गेला असतानाही संस्थेकडून अद्याप गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवड प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये तीव्र अस्वस्थता व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुणवत्ता यादी का जाहीर होत नाही, निवड झालेल्या उमेदवाराची घोषणा कधी होणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती संस्थेकडून देण्यात आलेली नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यातील विलंबामुळे सर्व उमेदवार संभ्रमात असून मानसिक तणावाखाली आहेत.
या प्रकरणी जागरूक नागरिक गजानन नागोराव खंदारे यांनी २७ डिसेंबर २०२५ रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल करून निवड झालेल्या उमेदवाराची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख कोणती, याबाबत स्पष्ट माहिती मागितली आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार शाळेच्या सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांना या अर्जाचे वेळेत उत्तर देणे बंधनकारक आहे.
दरम्यान, शैक्षणिक संस्थांतील भरती प्रक्रियेत पारदर्शकता व वेळेचे पालन अपेक्षित असताना, सद्धम्म उच्च माध्यमिक विद्यालयाच्या या कारभारामुळे संशयाची सुई संस्थेच्या कार्यपद्धतीकडे वळली आहे. आता माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरातून नेमके काय सत्य बाहेर येते, याकडे उमेदवारांसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
(सदरील बातमी सर्वांनी घ्यावी हि विनंती मी काल पण पाठवली कुणीही घेतली नाही.माझ्या वर्गमित्राची आहे



