Uncategorized

कोणदरी रस्त्याची जड वाहनांमुळे दुरवस्था; अवैध मुरूम वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील कोणदरी गावातून जाणारा मुख्य रस्ता जड वाहनांच्या वर्दळीमुळे अक्षरशः चाळणी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अवैध मुरूम तस्करीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना, संबंधित विभागांकडून मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सदर रस्ता अवघ्या दोन वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आला होता. मात्र सध्या पोहरादेवी ते दहिसावळी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने, कोणदरी गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करण्यात येत आहे. या मुरूमाची वाहतूक करण्यासाठी जड वाहने सातत्याने कोणदरी रस्त्यावरून ये-जा करत असल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून धूळ व सैल गिट्टीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. विशेषतः शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार घडत असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून,
रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी,
अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीवर कडक कारवाई करावी,
तसेच मुरूम वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा,
अशी ठोस मागणी कोणदरी ग्रामस्थांकडून संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार करून मागणी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button