Uncategorized
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत प्रभात प्रभाग क्रमांक १४ येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विकासात्मक कामांचा शुभारंभ करण्यात आला. सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार राजूभाऊ नजरधने यांच्या हस्ते करण्यात आले असून, यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.
या प्रसंगी नगराध्यक्ष सौ. सुनंदा दिलीप कोपरकर, नगरसेविका रुपाली संतोषराव कोलेकर, मारलेगावकर, नगरसेवक शैलेश कोपरकर,दिलीप कोपरकर, नितीन नरवाडे, संतोष कोलेकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामामुळे प्रभात प्रभाग क्रमांक १४ मधील नागरी सुविधा अधिक भक्कम होणार असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे.



