ढाणकी शहरात राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अभिवादन सोहळा; विविध मान्यवरांची उपस्थिती

सहसंपादक शेख मुजाहिद
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती ढाणकी शहरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शहराच्या मुख्य चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माँसाहेबांना अभिवादन केले.भारत मुक्ती मोर्चा च्या पुढाकाराने सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन ही जयंती साजरी केली.
यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नवनिर्वाचित नगरसेवक प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक विनोद कांबळे आणि प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक नागेश सातोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामरावजी गायकवाड लाभले होते.
प्रारंभी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
“जिजाऊंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन,विचारांना आत्मसात करून अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांनी,आपण सर्वांनी अशाच पद्धतीने महापूरुषांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात.”असे प्रतिपादन युवा नेतृत्व मुनव्वर पठाण यांनी केले.
तद्वतच प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिनेश रावते, डॉ.अंतकुमार जाधव,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.रामरावजी गायकवाड, दिलीप कलाले,शेख इरफान भाई,विलास गायकवाड,शेख इनायत,डॉ.जाधव,दिनेश रावते,अमोल पाटील,विक्रम प्रेमीलवाड,स्वप्निल चिकाटे, अजीज खान,गोलू मुनेश्वर,शेख सादिक, दिलीप कलाने,जब्बार भाई,संदीप पाईकराव,यांची उपस्थिती होती. या सर्वांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन करून अर्पण करून त्यांच्या जयंतीनिमित्त
शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन व आभार कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन भारत मुक्ती मोर्चा चे प्रकाश कांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विक्रम मुदीराज यांनी मानले. या कार्यक्रमामुळे ढाणकी शहरात सामाजिक व धार्मिक वैचारिक सलोख्याचा संदेश जाऊन उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.



