१० व्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ.अजय नरवाडे उमरखेड च्या शिरपेच्या मानाचा तुरा

एस पी दळवी
उमरखेड
सामाजिक, धार्मिक,राजकीय तसेच विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नरत असणारे साहित्य अभ्यासक उमरखेड शहरातच नव्हे तर तालुक्यामध्ये अंकल या नावाने प्रसिद्ध असणारे सर्वांचे चाहते डॉ. अजय नरवाडे यांच्या कार्याची दखल घेत भूतान मध्ये होणाऱ्या १० व्या शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
डॉक्टर अजय नरवाडे यांनी यापूर्वी मलेशिया,श्रीलंका,
इंडोनेशिया, दुबई, थायलंड आदी देशातील साहित्य संमेलनास उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे.१० ते १७ जानेवारी २०२६ या सात दिवसाच्या कालावधीत चालणाऱ्या मराठी विश्व साहित्य संमेलनात भारतातील अनेक प्रतिभावंत साहित्यिक या ऐतिहासिक समारंभाला उपस्थित राहणार आहेत शब्द परिवाराचे अध्यक्ष संजय सिंगलवार व उपाध्यक्ष यांनी डॉक्टर अजय नरवाडे यांच्या कार्याची दखल घेऊन उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपदी निवड केली आहे. अबाल वृद्ध ज्यांना अंकल या नावाने हाक मारतात असे सर्वांचे प्रिय असणारे डॉक्टर अजय नरवाडे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



