शहर

महागाव येथे भाजप शहर मंडळाची संवाद बैठक संपन्न


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार मंगळवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी महागाव शहर मंडळाच्या वतीने बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व सक्रिय कार्यकर्त्यांची संवाद बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संवाद बैठकीस माजी तालुकाप्रमुख दीपक आडे, माजी तालुकाप्रमुख विलास शेंबे, शहर मंडळ अध्यक्ष निलेश नरवाडे, माजी नगर उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश पाटील नरवाडे, माजी तालुका सरचिटणीस संजय पाटे, भाजप गटनेते गजानन साबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम खंदारे, जगदीश नरवाडे पाटील व के. डी. नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच शहर मंडळ सरचिटणीस रघुनाथ नरवाडे, विशाल डाहळे, भाजप महिला तालुका अध्यक्ष मायाबाई राजनकर, नगरसेविका रंजना आडे नरवाडे, छाया खंदारे, पुष्पा कावळे, निर्मलाबाई सोयाम, मुकिंदा आबोरे, श्रीकांत राऊत, गजानन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत आगामी संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शक्ती केंद्र व बूथ पातळीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षकार्य अधिक जोमाने राबविण्याचे आवाहन केले.
या संवाद बैठकीमुळे महागाव शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटन वाढीसाठी सर्वांनी सज्ज होण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button