Uncategorized

काळी दौ खान येथे ग्रामपंचायतीत बोगस कामांचा आरोप; तक्रारदारास जीवे मारण्याची धमकी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
काळी दौ खान (ता. महागाव) येथे ग्रामपंचायतीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात बोगस व निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच नीशाताई संतोष राठोड असल्या तरी प्रत्यक्ष कारभार त्यांचे पती संतोष अंबादास राठोड हे पाहत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आज रोजी गावातील सुनीलभाऊ टेमकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या बोगस कामांबाबत जाब विचारला असता, संतोष राठोड यांनी चक्क लाकूड हातात घेऊन मारहाण करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या नाली बांधकाम व इतर ठेकेदारीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांना धमकावले जात असल्यामुळे सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा, असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी संबंधितांनी गटविकास अधिकारी (पंचायत समिती) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button