Uncategorized

मराठा सेवा संघाचा “मराठा कृषी भूषण पुरस्कार” अमृत पॅटर्नचे जनक शिवश्री अमृतराव देशमुख यांना जाहीर


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
मराठा सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “मराठा कृषी भूषण पुरस्कार” यावर्षी अमृत पॅटर्नचे जनक शिवश्री अमृतराव दादाराव देशमुख (रा. आंबोडा, ता. महागाव) यांना जाहीर करण्यात आला आहे.
मराठा सेवा संघातर्फे राजमाता, राष्ट्रमाता व स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मासाहेब यांच्या ४२८ व्या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त दि. १२ जानेवारी २०२६ रोजी जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ, सिंदखेड राजा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कापूस तसेच इतर पिकांमध्ये विक्रमी उत्पादन घेणाऱ्या “अमृत पॅटर्न”मुळे शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास व आर्थिक बळ मिळाले, या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मराठा सेवा संघाने अमृतराव देशमुख यांची निवड केली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, केंद्रीय मंत्री खासदार प्रतापरावजी जाधव यांच्यासह अनेक मान्यवर तसेच लाखो जिजाऊ व शिवभक्तांची उपस्थिती अपेक्षित आहे.
अमृतराव देशमुख यांना मिळणारा हा सन्मान महागाव तालुका व यवतमाळ जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असून, त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची ही पावती असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
जिजाऊ जन्मोत्सव व पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी शिवश्री दिगंबरराव जगताप (राज्य उपाध्यक्ष, मराठा सेवा संघ), सुरेशराव कदम (विभागीय अध्यक्ष), वसंतराव देशमुख (केंद्रीय कार्यकारणी सदस्य), पी. डी. शिंदे (जिल्हाध्यक्ष – जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद), श्रीकांत देशमुख (जिल्हा उपाध्यक्ष), डॉ. संदीप शिंदे (जिल्हा सचिव), अमोल जगताप (जिल्हा सहसचिव), उदयभाऊ नरवाडे (तालुकाध्यक्ष), पंकज देशमुख (तालुका सचिव), सतीश ठाकरे (तालुका कोषाध्यक्ष), प्रसिद्धीप्रमुख गजानन वाघमारे, नानाभाऊ ठाकरे, दत्तराव कदम, सुनील भरवाडे, दिनेश देशमुख यांच्यासह मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अमृतराव देशमुख यांची भेट घेऊन दिनदर्शिका, निमंत्रण पत्रिका व पुष्पगुच्छ देत अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button