Uncategorized

टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान 2024 : महागाव तालुक्याचा गौरव


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या टीबी (क्षयरोगमुक्त) ग्रामपंचायत अभियान 2024 अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महागाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.
एका वर्षाच्या कालावधीत क्षयरोग निर्मूलनासाठी प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, उपचार व रुग्ण पाठपुरावा यामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य विभाग, महागाव तालुका यांच्या वतीने संबंधित ग्रामपंचायतीस ब्राऊन मेडल व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या गौरव सोहळ्यात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण भटाने, ग्रामपंचायत अधिकारी राजुरे साहेब व सरपंच अमोल चिकने यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास तहसीलदार अभयजी मस्के, गटविकास अधिकारी कदम साहेब, तालुका आरोग्य अधिकारी धुळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी टीबीमुक्तीसाठी ग्रामपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत भविष्यातही हीच गती कायम ठेवण्याचे आवाहन केले.
टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानामुळे ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून, ‘टीबी मुक्त भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेला बळ मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button