Uncategorized

गुंज येथे शेतकऱ्याची गाय चोरीला रात्री दोन ते चारच्या सुमारास प्रकार; महागाव तालुक्यात जनावर चोरीचे वाढते प्रमाण


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील गुंज येथील शेतकरी गजानन किसन जाधव यांची गाय दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री दोन ते चारच्या सुमारास चोरीला गेल्याची घटना घडली आहे. जाधव यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी आपली गाय मित्र साहेबराव सोपान तडस यांच्या घरातील खुट्यावर बांधली होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी याच ठिकाणाहून गाय चोरून नेली.
या परिसरात यापूर्वीही बकऱ्यांच्या शेडमधून तब्बल 30 ते 40 बकऱ्या चोरीला गेल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. त्या वेळी राखणदाराचे हातपाय बांधून, शस्त्र दाखवून जनावरे पळवून नेण्यात आली होती. याबाबत महागाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्या गंभीर गुन्ह्यांचा आजपर्यंत छडा लागलेला नाही.
त्यामुळे पुन्हा गाय चोरीची घटना घडल्याने शेतकरी व पशुपालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी किसन जाधव यांनी महागाव पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र सातत्याने घडणाऱ्या जनावर चोरीच्या घटनांमुळे महागाव तालुक्यात जनावर चोरीचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जनावर चोरीसारखे गुन्हे उघडकीस आणणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले असून, शेतकरी व पशुपालकांकडून रात्रीची गस्त वाढवावी, सीसीटीव्ही व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button