शहर

महागाव तालुक्यात हृदयविकाराचे वाढते झटके; पाच जणांचा मृत्यू थंडीचा कडाका घातक ठरत असल्याचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात अल्पावधीत एकापाठोपाठ पाच जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटेच्या वेळेत होणारा तापमानातील तीव्र बदल हा यामागील प्रमुख कारण ठरत असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
हवामान विभागाने यंदा फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, थंड वातावरणात पहाटेच्या सुमारास रक्तवाहिन्यांचे आकुंचन (Vasoconstriction) वाढते. त्यामुळे हृदयावर ताण येऊन हृदयविकाराचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या दुर्दैवी घटनांमध्ये महागाव येथील दोन वकील, हिरो होंडा शोरूममधील एक व्यवस्थापक, आमने येथील एक शेतकरी तसेच मुढाणा येथील एका शेतकऱ्याचा समावेश आहे. सर्वांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर डॉक्टर संदीप गायकवाड (एमबीबीएस) यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. थंडीच्या काळात गरम कपडे वापरणे, कोमट किंवा गरम पाणी पिणे, सकाळी लवकर थंडीत अचानक बाहेर जाणे टाळणे तसेच घरच्या घरी हलका व्यायाम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी व वयाच्या चाळीशी नंतर काही चाचण्या करून घेणे महत्त्वाचे आहे कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉक्टर गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button