Uncategorized
माळकिनी येथे तरुणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
मोजा माळकिनी येथील शेतामध्ये सागर राखोंडे (वय 36__) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच संबंधित बाब तात्काळ पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत सागर राखोंडे यांचे लग्न झाले नव्हते, अशी माहिती नातेवाईकांकडून मिळत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



