Uncategorized

कृषी उत्पन्न बाजार समितीची पोलखोल

शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर उत्पादन खर्चापेक्षा अधिक हमीभाव द्यायलाच हवा!

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे

शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अधिक हमीभाव मिळावा, कृषी उत्पन्न बाजार समितीत तात्काळ शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, तसेच हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या ठाम मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला लहुजी क्रांती मोर्चा यांचे जाहीर समर्थन लाभले.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, शेतमालाला योग्य हमीभाव मिळाल्यास शेतकरी स्वाभिमानाने जीवन जगू शकतो, कर्जाच्या विळख्यात अडकत नाही आणि आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ येत नाही. मात्र सध्या बियाणे, खते, औषधे, मजुरी यांचे दर प्रचंड वाढलेले असताना शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच अतिवृष्टी, अवर्षण, जंगली प्राण्यांचा उपद्रव यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.

“शेतकरी वाचला तर देश वाचेल” या भूमिकेतून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून सहा टप्प्यांचे चरणबद्ध आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

मुख्य मागण्या :

▪️ महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मधील नियम 32(घ) व 1967 मधील नियम 94(डी) यांची तात्काळ अंमलबजावणी
▪️ हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई
▪️ सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे
▪️ कापूस व सोयाबीनच्या दरांचा गंभीर प्रश्न तात्काळ सोडवावा
▪️ हमीभावापेक्षा कमी दर मिळालेल्या शेतकऱ्यांना भावांतर फरकाची रक्कम तात्काळ द्यावी
▪️ रब्बी हंगामात नादुरुस्त डीपी तात्काळ दुरुस्त करून २४ तास वीजपुरवठा सुनिश्चित करावा

या मागण्यांचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व तहसीलदार यांना देण्यात आले.

शासनाने दखल न घेतल्यास पुढील आंदोलनाचा इशारा :

१५ जानेवारी – आमदार घेराव
३० जानेवारी – राज्यस्तरीय जेलभरो आंदोलन
२० फेब्रुवारी – मुख्यमंत्री हटाव व मंत्रालय घेराव आंदोलन

या आंदोलनात राष्ट्रीय किसान मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांचा लढा न्यायासाठी आहे…
हमीभाव हा अधिकार आहे, भीक नाही!
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने तात्काळ निर्णय घ्यायलाच हवा! अशी वागणे दीपक इंगळे शेतकरी नेते मनीष जाधव व इतर किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button