शहर

एसआयआर कॅम्प’बाबत भीती बाळगण्याचे कारण नाही; माजी उपनगराध्यक्षांचा उपक्रम केवळ मतदारांच्या सुविधेसाठीच – शेख सालीम शेवालकर


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): स्थानिक माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जाविद यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘एसआयआर कॅम्प’ (SIR CAMP) बाबत काही लोकांमध्ये विनाकारण भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अजिबात घाबरून जाऊ नये, असे स्पष्ट आवाहन आयोजक शेख सालीम शेवालकर यांनी केले आहे.
​पत्रकारेशी बोलताना शेख सालीम शेवालकर म्हणाले की, “काही लोक या कायदेशीर आणि लोकहितैषी उपक्रमाला विनाकारण घाबरत आहेत, परंतु यात भीती बाळगण्यासारखे काहीही नाही. हा कॅम्प केवळ गावातील सुजान मतदारांची अधिकृत नोंदणी व्हावी आणि कोणाचाही मतदानाचा हक्क सुटू नये, याच पवित्र उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी जुनेद कंपनी, शेख फेरोज खुरेशी, अब्दुल बाखी, अफरोज भाई उपस्थित होते. ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून प्रशासकीय नियमांनुसार बी.एल.ओ. (BLO) च्या माध्यमातून राबवली जात आहे. ज्यांना हा उपक्रम किंवा प्रक्रिया समजून घेण्यात अडचण येत असेल, त्यांनी थेट माझी (शेख सालीम शेवालकर) भेट घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे किंवा अधिक माहितीसाठी 9527058555, 9146666123 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.”
​पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, लोकशाहीत मतदारांची माहिती अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या चर्चांना बळी न पडता, ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत नागरिकांनी मतदार ओळखपत्र, २ पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी या आवश्यक कागदपत्रांसह आपले फॉर्म भरून घ्यावेत. गावातील प्रत्येक मतदारापर्यंत ही माहिती पोहोचवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button