शहर

पांढऱ्या सोन्या’ची मातीमोल विक्री! दर कोसळले; CCI केंद्रे थंड


महागाव – संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील साई (ई) परिसरात कापसाला कवडीमोल भाव मिळत असून शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत. हमीभाव ₹8,110 प्रति क्विंटल असताना खासगी व्यापारी फक्त ₹6,500–₹7,000 दर देत आहेत.

गावात अनेक व्यापारी लायसनशिवाय, काटेमापे न पाळता अवैध खरेदी करत असल्याचा आरोप असून, APMC याकडे दुर्लक्ष करीत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

CCI केंद्रेही पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने शेतकऱ्यांना रांगा, ओलावा तपासणी, दर्जा पडताळणी अशी कोंडी सहन करावी लागत आहे. ऑनलाईन नोंदणीतील अडचणींमुळे शेतकऱ्यांचे हाल अधिक वाढले आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

CCI केंद्रे तातडीने सुरू करावीत

नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी

लायसनविना व्यापाऱ्यांवर कारवाई

APMCने गावोगाव तपास मोहीम

मनमानी दरांचा गोरखधंदा थांबवावा

कापसाचे विक्रमी उत्पादन असूनही योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी एकमुखी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपाल हरी राठोड यांनी केलीआहे.

—

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button