Uncategorized

माळवागत शेतशिवारात दिवसा वाघाचा वावर — शेतकरी भयभीत; वनविभागाकडे बंदोबस्ताची मागणी

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे

महागाव : तालुक्यातील माळवागत–मोहदी शेतशिवारात दिवसा वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकरी आणि मजूरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या गहू व हरभरा लागवडीची कामे सुरू आहेत. शेतात पाणी देणे, मशागत इत्यादी कामांसाठी वारंवार शेतात जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना वाघाच्या हालचालीमुळे धोका निर्माण झाला आहे.

3 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता शेतातील एका शेतकऱ्याला वाघाचा वावर आढळला. त्याने वाघाचे फोटो आपल्या मोबाईलमध्येही टिपले आहेत. यामुळे परिसरात भीती वाढली असून शेतकरी ‘काय करावे सुचेना’ अशा अवस्थेत आहेत.

वाघाच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी

शेतात जागोजाग (जागली) जाळणे,
आवाज करणे,मार्गावर प्रकाश टाकणे
अशा उपाययोजना सुरू केल्या आहेत.

शेतकरी वर्गाने वनविभागाला तातडीने पुढाकार घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा, पिंजरा लावावा आणि परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.

–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button