शहर
पुसद पोलिसांकडे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल — महागाव, उंबरखेड, पुसद परिसरातील चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला गती

महागाव प्रतिनिधी
पुसद पोलिसांकडे मोबाईल फॉरेन्सिक तपासणी व्हॅन दाखल झाल्याने महागाव, उंबरखेड, पुसद तसेच दराटी, बिटरगाव, पोफाळी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाढलेल्या चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे. महागाव पोलीस स्टेशनमध्ये अनेक चोरीचे गुन्हे प्रलंबित असताना ही व्हॅन कॉल डिटेल विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि तांत्रिक पुरावे मिळविण्यासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या सोयीमुळे हरवलेली मुले शोधणे, गुन्हेगारांचा माग काढणे आणि पेंडिंग प्रकरणे उकलण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत पुसद पोलिसांचे आभार मानले आहेत. महागाव तालुक्यातील भरपूर गुन्हे पेंडिंग असलेले या उपकरणामुळे निकाली निघतील अशी आशा महागाव नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



