Uncategorized

फुलसांगवी परिसरात पुन्हा गांजा प्रकरण! दराटी पोलीस स्टेशनची धडक कारवाई — गांजाची शेती उद्ध्वस्त


महागाव प्रतिनिधी — संजय नागरगोजे

फुलसांगवी परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणात गांजा येत असल्याबाबत दैनिक महासागरने केलेल्या वृत्तानंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, आता या परिसराच्या पुढील भागात प्रत्यक्ष गांजाची शेती सुरू असल्याची माहिती दराटी पोलीस स्टेशनला मिळाली. तत्काळ पथक रवाना करण्यात आले व ठिकाणी धडक छापा टाकत मोठी कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान पोलिसांना दाट झुडपांमध्ये लपवून ठेवलेली गांजाची लागवड, रोपे, वाळवलेला साठा तसेच काही लागवडीचे साहित्य आढळून आले. हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अंदाजे लाखो रुपयांचा माल नष्ट करण्यात आला.

या प्रकरणात काही संशयित व्यक्तींची नावे समोर आली असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तैनात आहे. येत्या काही दिवसांत आणखी कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दराटी पोलीस स्टेशनच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या भागात वाढत्या मादक पदार्थांच्या व्यवहारावर मोठा आघात बसला आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर गतिविधी दिसल्यास तत्काळ माहिती द्यावी.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button