शहर

महागाव नगरवाडी शेत शिवारात गांजा अमली पदार्थाची लागवड करणाऱ्या इसमावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात दिनांक 14- 10 -2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना नगरवाडी शेत शिवारात गांजा अमली पदार्थाची लागवड करणाऱ्या इसमाचे गुप्त माहिती मिळाली मौजे नगरवाडी तालुका महागाव येथील इसम नामे गजानन नारायण मेटकर हा त्याच्या नगरवाडी शेत शिवारात शेत सर्वे नंबर 12 /०१ यामध्ये गांजा आमली पदार्थाची झाडाची शेती करीत असताना गांजाच्या झाडाची लागवड केली आहे .अशी माहिती मिळाल्याने स्थानिक पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करून ,मौजे नगर वाडी येथे शेत सर्वे नंबर 12/01 मध्ये जाऊन इसम नामे गजानन नारायण मेटकर यास ताब्यात घेऊन पंचा समक्ष शेतीची पाहणी केली .असता शेतामध्ये एकूण 31 लहान मोठे आकाराची एकूण झाडे आढळून आली त्याची वजन 37 किलो 500 ग्रॅम अमली पदार्थ(गांजा) झाडे आढळून आली. त्याचे बाजारभावाने किंमत 1,87,500/-रुपयाचा मुद्द्यामाल जप्त करून इसम नामे गजानन यास ताब्यात घेतले एन डी पी एस कलम 8 (ब)20(b),(I) अन्वये अपराक्रम 520/2025 प्रमाणे गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडे कार, रमेश राठोड, सुनील पंडागळे ,रवींद्र श्रीरामे ,राजेश जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button