शहर

लोकांच्या प्रश्नांसाठी निर्भीड समाजसेवक ओळखले जाणारे हमीद खान निवडणुकीत प्रभाग क्रमांक 03 मधून भाजप कडून मैदानात.!

समुद्र से कह दो अपनी लहरें शांत रखे.! क्योंकि हम आ रहे हैं नई सुनामी लेकर

उमरखेडच्या राजकारणात नवा चेहरा; प्रभाग क्रमांक 3 उमरखेड हमीद खान यांची भाजप कडून उमेदवारी चर्चेत !

शेख मुजाहिद सह-संस्थापक मो 7798306192

समाजसेवक व भाजप कार्यकर्ता तसेच नितीन भाऊ भुतडा यांचे अत्यंत विश्वासू व एकदम जवळ समजले जाणारे एक धडाडीचे कार्यकर्ते हमीद खान आता राजकारणात सक्रीय होण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या उमरखेड शहरात रंगली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवकपदासाठी त्यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सामाजिक भान, जनतेशी थेट नाळ जोडलेली आणि निर्भीड सामाजिक कार्य माध्यमातून अनेक वर्षे सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणारे हमीद खान आता थेट लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्विकारण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक 3 हा उमरखेड शहरातील एक महत्त्वाचा आणि दृष्टीचा भाग असून येथे पायाभूत सुविधा, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी यांसारख्या प्रश्नांवर लोकांची तक्रार
आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या व्यक्तीची गरज भासत होती, आणि त्यामुळेच हमीद खान यांच्या नावाला जनतेत चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राजकारणात पार्श्वभूमी नसतानाही जनतेशी असलेला संपर्क, त्यांच्या प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका, आणि कार्यक्षम नेतृत्व यामुळे हमीद खान हे उमरखेड प्रभाग क्रमांक 3 मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. काही स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवत, आम्हाला काम करणारा नेता हवा, प्रसिद्धीचा हव्यास नसलेला नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. राजकारणात नव्या दमाच्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी देण्याची वेळ आली आहे, असे मतही काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त करत हमीद खान यांचे स्वागत केले आहे. आता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button