कास्तकाराना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिक नुकसान भरपाई आर्थिक मदत त्वरित द्यावी…..

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
युवा शेतकऱ्याचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन…
उमरखेड तालुका प्रतिनिधी ….. याजकडून दिनांक.२२/०८/२०२५.
जगाचा पोशिंदा कास्तकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोणतेही सर्वेक्षण न करता सरसगट कास्तकाराना प्रत्यक्ष आर्थिक पिक नुकसान भरपाई ची आर्थिक मदत त्वरित देण्यात यावे याबाबत अनिरुद्ध उषा सुरेश बक्षी निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले.
तसेच मौजा संगम चिंचोली (दलीत वस्ती) ता. उमरखेड येथील अतिवृष्टी ने संपूर्ण संगम चिंचोली गाव दोन नद्यांचा संगम असल्याने गावाला पाण्याने वेढले आहे सदर गाव २००६ पासून पुनर्वसन करण्याचे प्रस्तावित आहे पण आणखी काहीच पुनर्वसन झाले नाही त्याबाबद निवेदन देण्यात आले.
अनिरुद्ध उषा सुरेश बक्षी निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना प्रत्यक्ष निवेदन देताना प्रगतशील युवा शेतकरी गजानन वानखेडे मरसुळकर, ग्रामपंचायत सदस्य संगम चिंचोली येथील सुमेध नवसागरे यांनी निवेदन दिले.
सतत तीन दिवस पावसामुळे शेत शिवारातील उभे असलेले पिक उद्ध्वस्त झाले, संपूर्ण पिकांची नासाडी झाली,डोळ्यासमोर पिक पाण्यात वाहून गेले.याचे दुःख शेतकऱ्यांना झाले, बऱ्याच गावात पाणी शिरल्याने घर पाण्याखाली गेले.त्यामुळे गावकरी हतबल झाले.
आज खऱ्या अर्थाने प्रत्येक शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक पिक नुकसान भरपाई शेतात प्रत्यक्ष बांधावर जाऊन शासनाने पिक नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.तेव्हाच शेतकऱ्यांना आनंद होईल.



