Uncategorized

अखेर हरदडा फाटा ते पुसद रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात(आझाद समाज पक्षाच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग)

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या हरदडा फाटा ते पुसद या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी आजाद समाज पक्षाच्या वतीने भर पावसात चक्काजाम आंदोलन करून अभियंत्याला धारेवर धरत घेराव घालत त्यांच्या हस्ते नारळ फोडून रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते , रस्ता रोको आंदोलनाची तात्काळ दखल घेत हरदडा फाटा ते पुसद या खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीस अखेर सुरुवात करण्यात आल्याने आझाद समाज पक्षाच्या आंदोलनाला यश आले आहे,
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या मार्फत तब्बल 254 कोटी रुपये खर्च करून जी एन आय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातून रस्ता दुरुस्तीची काम करण्यात येणार आहे, कंत्राट मंजूर होऊन तब्बल वर्षभरापासून रखडलेला आहे, सदर नादुरुस्त खड्डेमय रस्त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकात प्रचंड रोष व्यक्त केल्या जात असल्याने आझाद समाज पक्षाच्यावतीने आक्रमक पवित्रा घेत रस्ता दुरुस्तीची मागणी करत 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी हरदडा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि जी एन आय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व कंत्राटदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तब्बल दीड तास रस्ता रोखला होता, रस्त्याचे कंत्राट घेणाऱ्या जी एन आय कंपनीच्या अभियंत्याला घेराव घालत त्यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते, त्यानंतर रस्ता दुरुस्तीच्या लेखी आश्वासन आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते, आंदोलनाचा धसका घेत कंत्राट दराने रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात केल्याने वर्षभरापासून रखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीस अखेर सुरुवात झाल्याने आजाद समाज पक्षाच्या आंदोलनाला यश आले आहे,

चौकट..
आझाद समाज पक्षाच्या आंदोलनानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली असून , हरदडा ते पुसद या नव्याने होणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामास आठवडाभरात हरदडा फाटा इथून सुरुवात न झाल्यास या पुढचे आंदोलन या पेक्षा तीव्र आणि आक्रमक स्वरूपाचे स्वरूपाचे असेल याची कंत्राटदार आणि संबंधित विभागाने नोंद घ्यावी..
प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे
जिल्हाध्यक्ष
आजाद समाज पार्टी यवतमाळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button