Uncategorized

नियमाचे उल्लंघन करून टोल नाका जागेत बदल करून सुरू करण्यात आला. ( मराठी भाषेचे बोर्डाची विसर),मनसे कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात बिजोरा येथे. दोन महिन्यापूर्वी बिजोरा टोल हा सुरू झाला .. वारंगा फाटा ते महागाव पर्यंत असलेल्या रस्त्याची येथे टोल वसुली केले जात आहे . प्रामुख्याने संपूर्ण रस्त्याच्या मधोमत हा टोल असणे आवश्यक होते उमरखेड हदगाव च्या मध्यभागी परंतु तसे न करता.. उमरखेड आणि महागाव या दोन तालुक्याच्या मध्येच ही टोल वसुली सुरू केली आहे. या बाबत सरकारी ध्येयधोरणे ही कारणे देतील .. ह्या बाबत शंका नाही .. पण NHAI नियमानुसार काही बाबी तसेच सुविधा ह्या टोल वर उपलब्ध असणे आवश्यक आहे.. NHAI च्या नियमानुसार टोल वर जे बोर्ड बसवले आहेत ते तीन भाषेत असणे आवश्यक आहे.. बिजोरा टोल वर फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे बोर्ड आहेत ? .. मराठी भाषेत बोर्ड का नाहीत ह्याचे उत्तर टोल कोण देणार ? .. टोल जवळ असलेली सार्वजनिक शौचालय बंद आहेत ? … टोल परिसरात क्रेन, ॲम्ब्युलन्स , पेट्रोलिंग गाडी ह्या तत्काळ सुविधा देतात का? .. ज्या संबंधित रस्त्याची टोल वसुली केली जाते त्या रोडवर CCTV camera असले पाहिजेत. त्याचे काम पूर्ण झाले आहे का ? .. संबंधित रस्त्यावर सर्वत्र ज्या लाईटची व्यवस्था केली आहे ते अद्यापही सुरू नाहीत .. वरील उपस्थित केलेली प्रश्नांची उत्तरे कोण देणार? .. कारण राजकीय पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते हे स्वतःच्या हिताचीच विचार करीत आहेत.. त्यांना टोल घेत नाहीत ..त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांना हिताच्या बाबतीत कोणताच निर्णय घेत नाहीत ..असे दिसत आहे .. कोणीही टोल देण्यापूर्वी हे प्रश्न उपस्थित करा .. त्या नंतरच टोलचे पैसे द्या.. ही जनजागृती करा .. टोल नियमांनुसार देण्यास कोणीही विरोध करणार नाही.. पण ह्या मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.. पुढील काही दिवसांत ह्या सुविधा जर मिळाल्या नाहीत तर टोल वर मोठे आंदोलन उभे राहील .. असे मनसे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले ह्या बाबत शंका नाही…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button