Uncategorized

महसूल मंत्री यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करतील का ?(शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान नदीकाठील शेतजमिनी खरडून गेल्या यांचे पंचनामे करण्याची मागणी)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी नाल्याला पूर आल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत महसूल मंत्र्याच्या समक्ष 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या गौतमी पाटील यांच्या बहारदार नृत्य मध्ये सामील होण्यासाठी मोठमोठे बॅनर लागले आहे .दहीहंडी मध्ये मराठी नटी सुप्रसिद्ध लावणी कलाकार यांच्या कार्यक्रमात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दही हंडी फोडल्या जाणार ही दहीहंडी लाख 2 लाख नाहीतर 11 लाखाची आहे परंतु अकरा हजार रुपये मागील पंधरा वर्षात भाजपाच्या कार्यकाळात एकही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शिस्तीच्या पक्षाकडून दिल्या गेले नाहीत हा विषय चर्चेला जात आहे. मागील वर्षी दहीहंडी कार्यक्रमांमध्ये एका नागरिकाला अपंगत्व स्वीकारावे लागले. दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितीती इतक्या मोठ्या प्रमाणात होती की शेवटी चेंगराचेंगरी झाली यामध्ये एका तरुणाला आपले पाय गमावे लागले. याही वर्षी म्हणजेच 21 ऑगस्ट 2025 रोजी उमरखेड येथे विद्यमान आमदार यांच्या पक्षाकडून दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री संजय राठोड सह अनेक पक्षातील कार्यकर्ते, राज्याच्या सत्तेतील सरकारमधील आमदार खासदार तथा मंत्र्यांची उपस्थिती या जिल्ह्यासाठी आकर्षण ठरली आहे. या जिल्ह्यात शेतकरी यांचे समस्याने थैमान घातले आहे. वीज पडून शेतकरी शेतमजूर तथा पाळीव प्राण्यांचा शेकडोच्या प्रमाणात जीव गेला आहे.

तालुक्यातील वेणी धरण या ठिकाणी अनेक जनावरे धरणामध्ये वीज पडून मृत पावली परंतु या बाबीकडे सत्तेतील पक्षाचा शेतकऱ्यांचे मंत्री असलेले महसूल मंत्री यांनी याकडे विशेष दुर्लक्ष केले खरे तर उमरखेड महागाव विधानसभेमध्ये 15 ऑगस्ट 16 ऑगस्ट 17 अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याचे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे पूस धरण वेणी धरण यांचे पाणी सोडल्यामुळे नदीकाठी शेतकऱ्यांच्या जमिनीकडून व पिक खडून गेले आहे असे गंभीर विषय असताना त्याकडे दुर्लक्ष करून असे प्रोग्राम घेणे उचित होईल का? जनतेमध्ये चर्चेला उधाण आले आहे. विविध समस्या आहेत .या समस्यांकडे विद्यमान आमदार सत्तेतील नेते म्हणून मिरवणारे “भाऊ” नी कोणतेही लक्ष दिले नाही. ज्या ठिकाणी विद्यमान आमदारांचा दौरा होतो त्या ठिकाणी शेतकरी आपली कैफियत मांडतात परंतु ज्या जनतेने शेतकरी शेतमजुरांनी ज्यांना निवडून दिले तेच त्यांच्यावर रागावतात असे अनेक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर या अगोदर प्रसारित झाले आहे. खरे तर या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महसूल मंत्र्यांनी यावे ही रास्त अपेक्षा ! या मतदार संघातील शेतकऱ्यांची शेतमजुरांची समस्या सोडविण्यासाठी येणे अपेक्षित होते .परंतु महसूल मंत्री दहीहंडीच्या कार्यक्रमाला येणार असल्याचे पॉम्पलेट नुकतेच सत्तेतील पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांची फोटो हँडबील मध्ये आहे तसेच शेजारील आमदार खासदार सुद्धा या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावणार असल्याचे सध्या सोशल मीडियावर फिरून शेतकऱ्यांच्या मोबाईलच्या हाती जात आहेत. कधीकाळी या मतदारसंघांमध्ये शेतकरी सुजलाम सुफलाम होता परंतु महसूल मंत्री उमरखेडच्या दहीहंडीला उपस्थित राहणार हा जनतेमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या छातीवर मुंग दळून गौतमीचा नाच होणार आहे .त्या नाचामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात असताना नृत्यचा विषय चर्चिल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button