Uncategorized

प्रेस नोट उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प ईसापुर धरण धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

मुख्य संपादक मो.9021233696

दिनांक 16.08.2025 वेळ दु.4:00 वा. यवतमाळ हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की ईसापुर धरणाच्या मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार दिनांक 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये 75% विश्वासहर्ता नुसार ईसापुर धरणाची पाणी पातळी 440.610 मीटर इतकी ठेवायची आहे. आज दिनांक 16/8/2025 दुपारी 3:00 वाजता ईसापुर धरणाची पाणी पातळी 440.670 मीटर इतकी असून, उपयुक्त पाणी साठा 932.60 दलघमी (96.73%) आहे. ईसापुर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा येवा व धरण पाणी पातळी नियंत्रीत करण्याच्या दृष्टीने ईसापुर धरणाची 9 वक्रद्वारे 50 सेंटीमीटरने सुरु असून त्याद्वारे 423.69 क्युमेक्स (14963 क्युसेक्स) इतका विसर्ग पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधुन येणारा येवा विचारात घेता सांडव्याद्वारे विसर्ग वाढविणे / कमी करणे बाबत वेळोवेळी निर्णय घेण्यात येईल व त्याबाबत अवगत करण्यात येईल.

ईसापुर धरणाच्या खालील बाजूस आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे पेनगंगा नदिपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:00 वाजता किनवट नजीक असलेल्या खरबी पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे.

सद्यस्थितीत इसापुर धरणामधुन केवळ 423.69 क्युमेक्स इतका विसर्ग सुरु आहे. ईसापूर धरणाच्या खालील बाजूस किनवट परिसरात निर्माण झालेली पूरसदृश्य परिस्थिती ही हदगाव (125mm), हिमायतनगर (218 mm), उमरखेड, पाटोदा ता किनवट (107 mm) किनवट (अंबाडी 195mm) या तालुक्यातील परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आहे. तरी या प्रेस नोट द्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ईसापूर धरणाच्या विसर्गाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button