Uncategorized

गरजू शेतकऱ्यांना ‘एन. आर. के. सोशल वेल्फेअर फाउंडेशन’चा आधार

  • अन्नधान्य सहित 40 स्पिंकलर सेट, पीठगिरणी , लॅपटॉप व अन्य साहित्याचे वाटप

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- तरोडा गावातील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबईत नोकरी करणारे श्री. रामेश्वर कुऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या ‘एन. आर. के. सोशल वेल्फेअर फाउंडेशन’ मार्फत गावातील गरजू आणि अपंग व्यक्तींना मदतीचा मोठा हात देण्यात आला. 28 जुलै रोजी तरोडा गावात पार पडलेल्या या उपक्रमात 40 शेतकऱ्यांना स्पिंकलर सेट, 25 फवारणी पंप, 10 चार्जिंग फवारणी पंप, गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप, ठिबक सिंचन संच ,पीठ गिरणी ,इन्व्हर्टर व अन्य साहित्य सहित अन्नधान्य वाटप करण्यात आले.

या कार्यामध्ये कुऱ्हाडे यांना त्यांचे जवळचे सहकारी अविनाश जाधव व अनिल गायकवाड यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्यांनी या उपक्रमात आपला खारीचा वाटा उचलून शेकडो गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.

याआधी सुद्धा या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले असून, या कार्यामुळे गावात सामाजिक जागरूकता वाढीस लागली आहे. तरोडा गावाच्या प्रगतीसाठी शासनाच्या योजनांबरोबरच अशा खाजगी संस्थांची साथ अतिशय महत्वाची ठरत आहे.

या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी संदीपभाऊ खंडाळे, राजेश डोडल, पंजाबराव पवार, संदीप चव्हाण, कैलास पवार, जयवंतराव गायकवाड, संतोष जाधव, शामराव गायकवाड, मारोतराव देशमुख, विजय राठोड, भीमराव धुळे, साहेबराव पाईकराव, राजू गायकवाड, कामाराव गायकवाड, रोहिदास पुलाते आदींचा समावेश होता.

शासनाच्या मदतीची गरज:

एकीकडे ही संस्था आपल्यापरीने शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवत आहे, तसंच राज्य सरकार व कृषी विभागाने अशा स्वयंसेवी संस्थांशी हातमिळवणी करून मदतीचा कार्यभाग अधिक व्यापक करावा, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतीच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनानेही अधिक सक्रिय भूमिका घेणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button