कलावंताच्या न्याय मागण्या संदर्भात शासन दरबारी शर्थीचे प्रयत्न करणार ! – आमदार किसनराव वानखडे

शेख मुजाहिद ससंपादक मो .7798306192
उमरखेड / महागांव : महापूरूषांच्या व राष्ट्र संतांच्या विचाराने समाजाला दिशा देणारे संस्कृती संवर्धन जतन करणार्या राज्यातील हजारो कलावंतांचे जिवनमान ऊंचावण्यासाठी शासनाने अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. त्यात प्रामूख्याने जेष्ठ कलावंताच्या मानधनात दूप्पटीने वाढ करून सरसकट सर्व कलावंतांना पाच हजार रूपये मानधन मंजूर करणे, विविध धार्मीक स्थळाहून पंढरपूर, आळंदीला येणार्या वारकरी कलावंतांच्या व दिंडीला सूखसोयी मिळण्यासाठी
नोंदणीकृत वारकरी कलावंत दिंडीला वर्षाला विस हजाराचे अर्थसहाय्य देणे आणि वारकरी कलावंतांसाठी आर्थिक विकास मंडळ गठीत करणे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सूरू केल्याने राज्यातील कलावंतांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे विचार अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती शाखा सवनाच्या यांच्यावतीने आयोजित कलावंत मार्गदर्शन व सन्मान परिषदेला संबोधित करतांना आमदार किसनराव वानखेडे ह्यांनी व्यक्त केले.

कलावंत समितीच्यावतीने पदाधिकार्यांनी ह्या परिषदेमधे ज्या आग्रही मागण्या केल्यात त्यात प्रामूख्याने ,जेष्ठ कलावंतांचे तीन वर्षापासूनचे प्रलंबीत असलेले मानधन प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, कलावंताचे मानधनासाठी जिल्हानिहाय वर्षाला ठरलेले ईष्टांक दूप्पटीने वाढवणे ,महीला कलावंतांचे मानधन निवडीतील आरक्षण पन्नास टक्के करणे, कलावंतांना महाराष्ट्रभर प्रबोधनाकरीता प्रवास करावा लागतो त्यासाठी एस.टी मध्ये मोफत प्रवास सवलत देणे, मानधनासाठी वयोमर्यादा पन्नास ऐवजी चाळीस करणे, उत्पन्नाची अट साठ हजाराहून एक लाख करणे, कलावंताना विमा संरक्षण देणे. कला संवर्धनासाठी तालूकास्तरावर सांस्कृतिक सभागृहाची निर्मिती व प्रशिक्षणाची सोय करणे या प्रमूख मागण्यासाठी शासनाकडे मजबूतीने शिफारस करून न्याय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले. ह्या प्रसंगी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे ह्यांनी मनोगत व्यक्त करतांना कलावंताचे न्याय हक्क पदरात पाडून घेण्यासाठी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गायकवाड ह्यांचे समर्थ नेतृत्वात शासनाच्या खांद्याला खांदा लावून प्रभावी कार्य करीत असल्याचे सांगीतले व गोरगरीब कलावंताच्या हिताचे कार्य करण्यासाठी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रात कार्य करणार्या लोकप्रतिनीधीनी कलावंत समितीमध्ये सहभागी होवून समर्पित कार्य करण्याचे आवाहन केले. ह्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील कलावंत मोठ्या संख्येनी हजर होते. आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते भजन गायन मंडळाच्या कलावंतांचा प्रशस्ती पत्र व शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार विजयराव खडसे, विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थ भवरे, राळेगाव तालूकाध्यक्ष तथा गूरूदेव सेवा मंडळ जिवन प्रचारक गंगाधरजी घोटेकर, हभप बोरकर महाराज मूळावा ह्यांनी मार्गदर्शन केले. गायक तथा प्रबोधनकार रमेश वाघमारे, हंसराज तलवारे व त्यांच्या संचानी आपल्या बहारदार शैलीत कलावंताच्या ऐक्यासाठी गायन प्रस्तूत केले. प्रास्ताविक अखिल भारतीय कलावंत समितीचे जिल्हा वारकरी आघाडी प्रमूख हभप दिगांबर गाडगे ह्यांनी केले .कार्यक्रमाचे संयोजन तालूका अध्यक्ष हभप.दत्ता मदने, उपाध्यक्ष शंकर बावणे ह्यांनी केले. प्रमूख अतिथीमध्ये सवना येथिल ग्राम पंचायत सरपंच, पोलीस पाटील ,माजी जिल्हा परीषद सदस्य आणि कलावंत समितीचे जिल्हा उपाध्यक्ष गूणवंत लडके, उमरखेड तालूकाध्यक्ष देवबन गोस्वामी, पूसद तालूकाध्यक्ष रणजित शेजूळे, विनायकराव माने, अनुलोम आर्णी केळापूरचे भागजनेवक शिवाजी सुरोशे उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी जय मल्हार वारकरी सेवा सांस्कृतिक मंडळ सवनाचे पदाधिकारी सुरेश गोरे, प्रकाश जाधव, राम दोडके, देवराव गोरे, देवराव सोळंके, प्रकाश ढोरे, नथू कांबळे, शंकर गायकवाड, सुभाष जाधव, आनंदराव टेकाळे, गणेश टेकाळे, कृष्णा धोगडे, हनवंता बेलखेडे, नामदेव टेकाळे, साहेबराव कदम, प्रकाश ठाकरे, लक्ष्मण टेकाळे व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.



