शितलादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच सभामंडप व इतर सुविधा साठी निधी उपलब्ध होणार

नामदार तथा पालकमंत्री संजय राठोड साहेब निधी उपलब्ध करून देणार
महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी यांच्या प्रयत्नाला यश
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
शहरातील प्रभाग क्रमांक एक ( पोलीस स्टेशनच्या मागील बाजुस ) येथिल प्राचिन तथा भाविकांचे श्रध्दास्थान असलेले प्रसिद्ध शितलादेवी मंदिरात जाणाऱ्या भाविक महिलांना , पुजेसाठी व देवीस प्रसाद अर्पण करतांना येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी मंदिर परिसरात फेरफटका करत तेथील पुजारी यांचे कडून समस्या जाणून घेतल्या व समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख ॲड संजिवकुमार जाधव , महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी , महिला शहर संघटक संगिताताई धाबे , माजी उपजिल्हाप्रमुख कैलास भाऊ कदम , उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर , प्रसिद्धी प्रमुख राजु गायकवाड , मंजुषाताई नरवाडे , भालेरावताई आदि उपस्थित होते



