Uncategorized

झराफाटा रस्त्यावर दुर्दैवी अपघात; हातल्याच्या युवकाचा मृत्यू

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- मुळावा लागत असलेल्या हातला येथील युवकाचा कळमनुरी तालुक्यातील झराफाटा परिसरात रविवारी रात्री १० वाजल्याचा सुमारास दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात किशोर शिवाजीराव चव्हाण (वय ३२ रा. हातला ) याचा जागीच मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेला अभिषेक मारुती पत्रे (वय ३०) हा गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, झराफाटा परिसरात रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्ता पळसांडलेला होता. दुचाकीवरून जात असताना गाडी स्लीप होऊन नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून पडली. या अपघातात किशोर चव्हाण याच्या डोक्याला गंभीर मार लागला. तात्काळ त्यास कळमनुरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक पत्रेवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

किशोरच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. आज हातला येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. किशोर च्या अकस्मात निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button