Uncategorized

नगरसेवकाच्या पळापळीमुळे वॉर्डाचा विकास होणार का?साडी चोळी पैसे वाटून नगरसेवक निवडून देतील का ?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव नगरपंचायत प्रभाग क्रमांक 17 मध्ये लेआउट धारकांनी कोणतीही सुख सुविधा न करता प्लॉटची विक्री केली त्यावेळेस प्लॉट धारकांनी कोणतीही तक्रार न केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. नगरसेवक पदाधिकाऱ्यांची प्रभाग क्रमांक 17 गणपती नगर मध्ये कानाडोळा शहरातील गेल्या दहा वर्षापासून विकास दूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपती नगर मध्ये विज, नळ, सिमेंट रस्ते ,नाली बांधकाम ,सोई सुविधा आतापर्यंत येथील रहिवाशांना मिळालेला नाही त्यामुळे येथील रहिवाशांना पावसाळ्यामध्ये विद्यार्थी व सर्व सामान्य रहिवाशांना भयानक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नगरपंचायत प्रशासन याकडे फिरून सुद्धा पाहिले नाही. नगरसेवक निवडून आले तेव्हापासून कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही . परंतु निवडणुकीच्या टायमाला मतदान करते मताची विक्री करून नगरसेवक निवडू देतात त्यावेळेस मतदान करते नागरिक कोणते सुख सुविधा आपल्या प्रभागात व्हाव्या म्हणून बोलून दाखवत नाही व विकास करणाऱ्या माणसाला निवडून देत नाहीत म्हणून वॉर्डाचा विकास कसा होणार ? त्याला जबाबदार कोण ? गेल्या एक वर्षापासून नालीसफाई काम कोणत्याच वार्डात झाले नाही. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे मच्छर डास प्रादुर्भाव होऊन नागरिकांना हगवण मलेरिया ताप यासारखी लागवण सगळीकडे झाली आहे. साधी फवारणी सुद्धा केली नाही वार्ड मेंबर फक्त साडीचोळी व पैसे वाटून निवडून येतो ! असा छाती ठोकपणे सांगतो त्यामुळे त्याला जबाबदार कोण ? याचा विचार नागरिकांनी व वार्डातील लोकांनी करावा , नगरपंचायत मध्ये काय चालू आहे .याची जाण सर्वसामान्य नागरिकांना माहित नाही रोज वृत्तपत्रात बातम्याप्रसाधित होत आहे. नगरपंचायत चा कारभार उंबरखेड येथून न.प.कार्यकारीअधिकारी उंबरखेड येथून कारभार पाहतो कायमस्वरूपी अधिकारी मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. आता जागृत व्हायची वेळ आली आहे. ज्याला उभे राहायचे त्याचे त्या प्रभागातील लोकांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर विकास कामाचे प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे . जो लिहून देईन त्यालाच मतदान करावे अशी वेळ आली आहे . आता चिखलातून जावे लागते पुढच्या वेळेस घरात पाणी घुसेल आता नागरिकांनी जागृत व्हायची वेळ आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button