महागांव नगरपंचायत नवीन देशी दारू परवानगी प्रकरणात बनावट प्रोसिडिंगवर खोट्या स्वाक्षऱ्या केल्याने पोलिसांत प्रमोद भरवाडे , करुणा शिरबीडे तक्रार दाखल!

महागांव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत मध्ये संगणमत करून कार्यालयाचे प्रोसिडिंग रजिस्टर मध्ये छेडछाड करून शुभम बाबूलाल जयस्वाल यांच्या नावाने देशी दारू दुकाना करिता ‘नाहरकत प्रमाणपत्र’ देण्याचा अफलातून प्रकार घडला.
महागाव नगरपंचायत मध्ये ठराव क्र. २७ लिहून आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करून दिशाभूल करून आपणाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असल्याने संबंधितांच्या विरोधात महागाव पोलीस स्टेशनला २७ जुलै रोजी तक्रार दाखल झाली.
२०२३ मध्ये प्रमोद भरवाडे हे नगरपंचायतीचे नगरसेवक असून करुणा नारायण शिरबीडे ह्या नगराध्यक्ष होत्या. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी नगरपंचायतची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्या सभेच्या अनुषंगाने सभेमध्ये एकूण २१ विषय घेण्यात आले होते. सदर विषयावर चर्चा होऊन मीटिंगमध्ये कामकाज नमूद करण्यात आले. गैर अर्जदार क्रमांक एक व दोन हे सदर मिटींगला हजर होते. सभेमध्ये घेण्यात आलेल्या विषयाचे ठराव प्रोसिडिंग रजिस्टर मध्ये लिहिण्याचे काम गैर अर्जदार क्रमांक दोनचे होते. त्या कामावर नियंत्रण अर्जदार क्र. एकचे होते असे असतांना तत्कालीन गैर अर्जदार क्र. दोन यांनी प्रोसिडिंग रजिस्टरचे पेज नंबर ८१ वर दि. १७फेब्रुवारी २०२३ विषय क्र. २७ ‘नाहरकत प्रमाणपत्र’ देण्याबाबत चर्चा करणे ठराव क्र. २७ प्रस्ताव महागाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात शुभम जयस्वाल यांचे प्रभाग क्र. १ मध्ये गट क्र. ३४ भुखंड क्र. १ / १ मध्ये आरसीसी बांधकाम असलेले दुकान गाळे क्र. ५ मध्ये यांना ‘नाहरकत प्रमाणपत्र देण्या करीता १५ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्ज नगरपंचायत कार्यालयात सादर केला. त्या अनुषंगाने सभागृहात सदर विषय उपस्थित केला असता शुभम बाबूलाल जयस्वाल यांना त्यांचे मालकीचे भूखंडामध्ये अनुज्ञप्ती दुकान चालू करण्याकरिता महागाव नगरपंचायत कार्यालयाकडून राज्य उत्पादन शुल्क व जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या नियमांच्या अधीन राहून तसेच देशीदारू बंदी बाबत पूर्ण नियमाचे काटेकोर पालन करून, शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील, या अटीवर ‘नाहरकत प्रमाणपत्र’ देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले तरी पुढील निश्चित कार्यवाही मुख्याधिकारी नगरपंचायत महागाव यांनी करावी, सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, असा खोटा ठराव लिहून त्यावर अध्यक्षाचा शिक्का मारून अध्यक्षांची खोटी स्वाक्षरी केली आहे. खोटा ठराव प्रोसिडिंग रजिस्टरला लिहून त्यावर सूचक अर्जदार क्रमांक दोन व अनुमोदक अर्जदार क्रमांक एक यांची नावे टाकली आहे. नमूद प्रमाणे कोणताही ठराव अर्जदार यांनी घेतला नाही. केवळ अर्जदारांना बदनाम करण्यासाठी गैर अर्जदारांनी संगणमत करून नगरपंचायत कार्यालयाचे प्रोसिडिंग रजिस्टरमध्ये छेडछाड करून शुभम बाबूलाल जयस्वाल यांचे नावाने देशी दारूचे दुकानाकरिता ना हरकत देण्याबाबत ठराव क्रमांक २७ लिहून अर्जदार क्रमांक दोन च्या खोट्या स्वाक्षऱ्या करून अर्जदाराची दिशाभूल करून अर्जदार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास करीत संबंधितावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी महागाव पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट दाखल करण्यात आला. महत्वाचे : तत्कालीन नगराध्यक्षा करुणा शिरबिडे आणि नगरसेवक प्रमोद भरवाडे यांनी ठरावावरील आमच्या सह्या डुप्लिकेट आहेत अशी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे परंतु महागाव नगरपंचायत मध्ये रोज रोज नवीन प्रोसिडिंग , ठराव दाखल होत आहेत हे एक नवलच आहे ! प्रकरण पोलिसात गेले आहे दूध का दूध पाणी का पाणी लवकरच होणार ! जनतेसमोर ढोंगी चेहरे लवकरच बाहेर येणार !



