पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्याचा सुळसुळाट !

अवैध धंदे बंद करण्याची भिम टायगर सेना जिल्हा कार्याध्यक्ष श्याम भाऊ धुळे यांची पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे मागणी
( कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार)
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत खुलेआम अवैध धंदे सुरू असून त्याची वसुली शिपाई लखन जाधव हे करीत असल्याबाबत लेखी तक्रार दी-25-7-2025 दिली आहे. त्यांचे

कॉल डिटेल अवैध धंदे करणारे मटका घेणारे खावाड, अवैध दारू ,रेती, जुगार ,अवैध मुरूम, करणारे त्यांच्या संगे आर्थिक संबंधाबाबत त्यांच्यासोबत फोनवरून नेहमी बोलणे सुरू

असते त्यांच्याकडून संपूर्ण ठाणेदाराची वसुली लखन जाधव हा शिपाई करतो. त्याचे कॉल डिटेल काढल्यास संपूर्ण प्रकार उघडकीस येईल अशी लेखी लेटर पॅड वर भीम टायगर सेना कार्याध्यक्ष श्याम धुळे यांनी पोलीस अधीक्षक डीएसपी

ठाणेदार यांना लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .आठ दिवसात कारवाई न झाल्यास अमरन उपोषण बसण्याचा इशारा लेखी निवेदनातून दिला आहे.



