प्राणघातक हल्ल्यातील आरोपीचा मृत्यूदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : दि . २६ तालुक्यातील धानोरा (सा) येथे २० जुलै रोजी धुर्यावर बैल चारण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीने प्राण घातक हल्ला करून पसार झालेल्या आरोपीचा मृतदेह शुक्रवार दिनांक २५ रोजी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील विडुळ शेत शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . मृत्युदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने व सततच्या पावसामुळे धानोरा (सा) ते चालगणी पांदन रस्ता खराब असल्याने तब्बल दोन किमी ट्रॅक्टर वरून पोलीस कर्मचारी व डॉ जयराम बस्सी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले .

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन रामा सोनुले (३६ ) रा धानोरा ( सा ) यांच्यावर शेतात बैल चारणाच्या वादावरून प्राणघातक हल्ला करून आरोपी कैलास रामा जाधव वय ४५ वर्षे रा धानोरा (सा) हा फरार झाला होता गेल्या काही दिवसापासून त्याचा शोध सुरू होता अखेर काल दुपारी स्थानिक ग्रामस्थांना गावापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर विडूळ शेत शिवारात संतोष विठ्ठलराव नगारे यांच्या शेतात एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची शेत शेजारी प्रभाकर कानकाटे यांना मिळाली त्यांनी लगेच विडूळ पोलीस पाटील गजानन मुलंगे यांना दिली त्यांनी ठाणेदार शंकर पांचाळ यांना घटने संदर्भात माहिती दिली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .
मृतकाचा मुलगा स्वराज जाधव यांनी मृत्युदेह हा माझ्या वडीलाचा असल्या चे सांगितले त्यावरून ओळख पटल्यानंतर मृतदेह हा कैलास जाधव हल्ल्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा असल्याचे स्पष्ट झाले मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मृत्यू हा विषारी औषध प्राशन केल्याने झाल्याचे अंदाज वैद्यकिय अधिकारी डॉ . जयराम बस्सी यांनी व्यक्त केला .
घटना स्थळाला ठाणेदार शंकर पांचाळ यांनी भेट दिली .
चौकट
धानोरा (सा ) येथून चालगणी कडे जाणारा पांदन रस्ता सततच्या पावसामुळे चिखलमय झाल्याने तब्बल दोन किमीचा प्रवास वैद्यकिय अधिकारी यांचेसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर वरून प्रवास केला . विडूळ प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकिय अधिकारी डॉ जयराम बस्सी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले तर सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश सरदार , पोलीस उपनिरिक्षक अमर खिल्लारे, पो .हवालदार दिलीप चव्हाण , गजानन फोले , गजानन गिते , तोषिक काजी , गिरप्पा मुसळे , सुनिल ढोंबरे पोलीस वाहन चालक , विडूळ पोलीस पाटील गजानन मुलंगे , धानोरा (सा) पोलीस पाटील विठ्ठलराव पाटील , सरपंच प्रकाश जाधव , तंतामुक्ती अध्यक्ष बालाजी काळे , डॉ स्वानील जिवणे , सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय काळे आदी उपस्थित होते .
(सोबत फोटो )
मृतक कैलास जाधव



