Uncategorized

वाकान येथील विद्युत पुरवठा चार दिवसांपासून खंडित!( लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्या सोडवतील का?)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागांव : तालुक्यातील वाकान कोदंरी चिखली मलकापूर येथील विद्युत पुरवठा लगातारच तिन चार दिवसांपासून खंडित होत असल्याने या परीसरात नागरिकांमधून चांगलाच आक्रोश निर्माण होत आहे.वाकान कोदंरी चिखली मलकापूर परीसरातील गावांमधील जवळपास शंभर टक्के कुटुंबातील नागरिकांनी मिटर जोडनी घेतली आहे व प्रत्येक दोन महिन्याला महावितरणाकडुन चांगल्याच औरेजने मिटर बिल वसूली केल्या जात आहेत मात्र विद्युत पुरवठा दिवसाआड खंडित होत असल्याने दळणवळणाच्या सुविधेसाठी येथील नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.येथील विद्युत पुरवठा कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे चित्र दिसत आहे.महावितरणच्या विद्युत पुरवठा कर्मचाऱ्यांनी येथील परिसरात काही दिवसांपुर्वी इलेक्ट्रॉनिक विद्युत तारा ऐवजी केबल टाकले आहे त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होणार असल्याचे कळते मात्र जेव्हापासून केबल टाकण्यात आले आहे तेंव्हा पासून विद्युत पुरवठा केंव्हाही दिवसाढवळ्या व रात्री बेरात्री खंडीत केल्या जात आहेत तिन ते चार दिवसांपासून वाकान कोदंरी चिखली मलकापूर येथील नागरिक अंधारातच असुन येथील कामचुकारपणा करणाऱ्या विद्युत पुरवठा कर्मचाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत व या गंभीर विषयावर विद्युत पुरवठा सुरू करण्याकरता लोकप्रतिनिधी पाठपुरावा करून अधिक्षक अभियंता यांच्याकडून तात्काळ तोडगा काढुन या परिसरात विद्युत पुरवठा कायम स्वरुपी सुरळीत करावा अन्यथा या परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दीला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button