महागांव तालुक्यात विना नंबर प्लेटच्या माल वाहतुक ट्रॅक्टर ट्रॉलींचा सुळसुळाट ! महागाव तालुक्यात जवळपास ५० ट्रॅक्टर ट्रॉल्या चोरीच्या असल्याची शंका !

( लेवा येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा छडा केवळ आठ घंट्यात उघड !
महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी टॅक्टर ट्रॉलीसह आरोपीला केली अटक ! )
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली दुचाकी चोरांचा सुळसुळाट
लेवा येथील शेतकरी ऋषिकेश गजानन खंदारे यांनी महागाव पोलीस स्टेशन ला २३ / ७ / २०२५ रोजी अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेल्याचा जबानी रिपोर्ट दी २५ / ७ / २०२५ रोजी दाखल केला. ट्रॅक्टर ट्रॉली कलर लाल नंबर एम .एच . २९ सी .बी . ५३ ४ ४ किंमत ८५००० रु .अशा तक्रारीवरून अ .क्र ०४२२ कलम ३०३ (२ ) गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याची चौकशी ठाणेदार निळे यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्याकडे दिली . राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी लेवा खडका येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून अवघ्या आठ घंट्यामध्ये आरोपी छडा लावून धम्मदीप सिद्धोधन इंगोले राहणार जनुणा ता महागांव यांना ताब्यात घेऊन त्याच्याजवळ चोरीची ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करून पोलीस स्टेशन महागाव येथे आणण्यात आली . महागाव तालुक्यात सध्याच्या परिस्थितीत ५० ते ६० टॅक्टर ट्रॉल्या बिगर नंबरच्या फिरताना दिसत आहेत. इतर तालुक्यातील ट्रॅक्टर ट्रॉल्या चोरी गेलेल्या आहेत.त्याचा तपास लावण्याकरता पोलीस

उपनिरीक्षक राठोड यांनी आरोपीचा पीसीआर घेत असल्याचे सांगितले त्यावरून महागाव तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली बगर नंबरच्या चोरीच्या असल्याच्या शंका निर्माण झाली आहे.अशा बिगर नंबरच्या सगळ्या ट्रॉल्या ची कागदपत्रे तपासणी करण्याचे ठाणेदार निळे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले . तसेच महागाव तालुक्यातील दुचाकी चोरांचा सुद्धा बंदोबस्त ठाणेदार साहेबांनी करावा अशी अपेक्षा आहे !



