Uncategorized

आय टी आय उमरखेड येथे विजय दिवस उत्साहात साजरा…..

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे 26 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री श्री मंगल प्रभातजी लोढा साहेब यांच्या संकल्पनेतून आज कारगिल विजय दिनानिमित्त “विजय दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम श्री डीपी पवार प्राचार्य ए डी कुंभारे , एस पी निंबोळकर अमित कुमार गायकवाड संस्थेतील सर्व शिल्प निदेशक ,कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये श्री ए डी कुंभारे प्रमुख वक्ता यांनी कारगिल विजय दिवसाचा इतिहासाला उजळणी देऊन शूर जवानांच्या शौर्य ,त्याग व बलिदान व देशाप्रती समर्पनाची यशोगाथा विशद केली. एस पी निंबोळकर यांनी देश संरक्षणासाठी सीमेवरील भारतीय सैनिकांची शौर्याची परंपरा ,देशाभिमान व देशाच्या संरक्षणासाठी करत असलेल्या महान कार्याविषयी माहिती दिली.श्री डी पी पवार प्राचार्य यांनी भारत देशाची ऐतिहासिक विजयी परंपरा, एक राष्ट्र ही ही संकल्पना , देशाची एकता, अखंडता व स्वाभिमानासाठी युवकांची सामाजिक जबाबदारी, बदलती सामाजिक परिस्थिती

,युवकांसमोरील आव्हाने व अडचणी यावर मात करून “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार “याप्रमाणे आत्मनिर्भर होऊन जीवनामध्ये यशस्वी व्हावे व देशभावना जपावी असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमित कुमार गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन श्री आशिष नारनवरे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील श्री कदम चिंचाळे, मयूर कुंभारे, सोनूळे शेख हर्षद ,नरवाडे मॅडम, निंबेकर मॅडम, कांबळे , धुळे ,पोपुलवाड व संस्थेतील सर्व व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी यांनी मेहनत घेऊन सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button