Uncategorized

एसटी बससेवा पूर्ववत चालू झाल्याने प्रवाशांना दिलासा!

जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी सोशल मीडिया तसेच तुळसीनगर ग्रा.पं.यांचे संयुक्त
पाठपुराव्याला यश!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

मोहदी ते पोहंडूळ मार्गे या रस्त्याचे काम धीम्यागतीने चालू होते. या मुळे जिल्ह्याच्या ठिकाणाहून चालू असलेली एस. टी. महामंडळ बस सेवा मागील सहा महिन्यांपासून बंद होती. नाईक फाउंडेशनच्या मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या प्रयत्नातून आणि तुळशीनगर ग्रामपंचायतने सतत पाठपुरावा केल्याने या मार्गावरून पुसद मार्गे काळी (दौ) दिग्रस, यवतमाळ बससेवा दोन दिवसांपासून पूर्ववत चालू झाली आहे. या मुळे सदर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांतुन समाधान व्यक्त होत आहे.

  ‌ या मार्गावर रस्त्याचे काम चालू आहे. रस्त्याचे काम चालू असल्याचे कारणावरून एसटी महामंडळाची बस सेवा काळी मार्गे यवतमाळ, पुसद गेल्या सहा महिन्यापासून बंद होती. हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे वाहनांचा अपघात होऊ शकतो, ही सबब पुढे करून महामंडळांनी या मार्गावरील बस फेरी बंद केली होती. परंतु काळी (दौ) बाजार पेठेच्या या मार्गावर एकूण 36 खेडे अवलंबून आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना आपल्या दैनंदिन गरजा, कामकाज, दवाखाना इत्यादी कामासाठी  या मार्गावरून प्रवास करावा लागतो. यामध्ये मजूर, विद्यार्थी, व्यवसायिक यांना शासकीय कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रचंड अडचण निर्माण होत होती.  या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करीत होते, ही बस सेवा बंद केल्यामुळे महामंडळाचे सुद्धा मोठे नुकसान होत होते, परिणामी प्रवाशांची अत्यावश्यक सेवा, गरज ओळखून ही बस सेवा पूर्ववत चालू करण्यासाठी रस्त्याची  पाहणी करून या मार्गावरून जमत नसल्यास दुसरीकडून पुसद, काळी, दिग्रस मार्गे किंवा वसंतनगर, कांदळी दिग्रस अथवा पुसद, काळी, तूपटाकळी या तीनही मार्गे काळी( दौ)  कडून आपली बस जाऊ शकते. या संदर्भातील रस्त्याची पाहणी करून बंद झालेली बस सेवा पूर्ववत चालू करून देण्यात यावी, या मागणीसाठी हंसराज मोरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया यांचे सह तुळशी नगर ग्रामपंचायतच्या सरपंच्या अर्चनाताई सचिन जाधव  यांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन ही बस सेवा पूर्ववत चालू करण्यासाठी पाठपुरावा केल्याने आणि नाईक फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या मार्गदर्शनात पाठपुरावा झाला. पुसद आगार व्यवस्थापक विजय गार्धने  यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. चालू झालेल्या बस फेरीसाठी  चालक मानिकराव घुरे आणि वाहक गणेश पवार यांचे या वेळी प्रवाशांनी  स्वागत केले, बससेवा सुरळीत झाल्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button