शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा ह्या मागणीसाठी राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन!

तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकरी, शेतमजुर, निराधार, दिव्यांगाचे मोठ्या संख्येने उपस्थिती!
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
नागपूर तुळजापूर हायवे महागाव येथील मातोश्री शाळेजवळील टी पॉइंट येथे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या शेतकऱ्याच्या 'सातबारा कोरा'या मागणीसह दिव्यांगाचे अनुदान वाढी संदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांनी जातीपातीचे राजकारण न करता शेतकऱ्याच्या न्याय मागणीसाठी आज 24 रोजी चक्काजाम आंदोलनाला केले.
शासनकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याची आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची अद्याप पूर्तता न झाल्याने महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन उभारले आहे.
बच्चु कडु यांनी शेतकऱ्याच्या या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात हजारो शेतकऱ्यांना 24 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणासह महागाव तालुक्यातील राज्य महामार्ग 361 वर चक्काजाम आंदोलन सुरू केले.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीचा लढा पेटला आहे . 24 जुलै गुरुवारी सकाळी 11ते 01 या कालावधीत राष्ट्रीय महामार्गा वरील मातोश्री विद्यालय महागाव समोरील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या चक्काजाम आंदोलनात तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते,सर्व शेतकरी, दीव्यांग,शेतमजूर,निराधार, यांनी जात धर्म पक्ष बाजुला ठेवून मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत चक्काजाम आंदोलन यशस्वी केले. या चक्काजाम आंदोलना संदर्भात स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. राज्य महामार्गावर दोन्ही साईडने प्रचंड वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी बराच वेळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. राज्य महामार्गावरील चक्काजाम आंदोलनात महागाव तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते, नेते शिवाजी देशमुख सोनेकर, अरुण पाटील ,अमृतराव देशमुख, शैलेश कोपरकर ,स्वप्निल नाईक, भवानकर आणि शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.



