Uncategorized

गंभीर जखमींच्या विरोधात महागाव पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल

दलित युवकावर महागाव पोलिसांत खोटा गुन्हा दाखल होत असल्याने दलित संघटना आक्रमक, उच्च न्यायालयात या प्रकरणी दलित संघटना दाद मागणार!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील पेढी ( इ) येथे 19 जुलै रोजी घराजवळील चाळलेल्या रेतीवर मरून टाकण्याचे वादातून मुस्लिम समाजातील काही व्यक्तींनी आणि बौद्ध समाजांच्या एका युवका सोबत वाद झाल्याची घटना घडली. आपल्या चुलत भावासोबतची भानगड सोडवण्यासाठी गेलेल्या पियुष कांबळे या युवकास डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर युवकाला डोक्यात जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाल्यामुळे सिटीस्कॅन, पुढील उपचारासाठी त्याच दिवशी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात रेफर केले. परंतु लगेच मुस्लिम पार्टी कडून दुसऱ्या दिवशी आर्थिक संबंध जोपासत 20 जुलै रोजी खोटा रिपोर्ट दाखल करून घेत जखमी युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा अफलातून प्रकार बाहेर आल्याने दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत.
रेतीवर मुरूम टाकल्याचे प्रकरणातून वाद विवाद झाला. यावेळी डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी करीत जातिवाचक शिवीगाळ केल्याने प्रकरण पोलिस स्टेशनला पोहोचले. आपल्यावर आता ॲट्रॉसिटी नुसार गुन्हे नोंद होतात, या मुळे विचार विनिमय करून कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेत सुप्त बुद्धीचा वापर करीत दुसऱ्या दिवशी दलित समाजावर दहशत निर्माण व्हावी, या हेतूने चक्क महागाव पोलिसात गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात ऍडमिट असणाऱ्या पियुष कांबळे नामक दलित युवकावर महागाव पोलिसांत विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे दलित संघटना पियुष कांबळे नामक उच्च विद्या विभूषित दलित युवकावर होत असलेल्या अन्यायाविरोधात एकवटल्या आहेत. 19 जुलै रोजी घटना घडली, त्यावेळी सदर महिला घटनास्थळी उपस्थित नव्हती. मग तिच्यावर जिल्ह्याच्या ठिकाणी उपचार घेणारा गंभीर जखमी युवक दुसऱ्या दिवशी विनयभंग करतोच कसा ? हे न्यायोचित वाटते का? खऱ्याचे खोटे आणि लबाडाचे तोंड मोठे असा महागाव पोलिसात खोटे गुन्हे नोंद होण्याचा प्रकार उघड झाला आहे. मुस्लिम आरोपी आणि महागाव पोलिसांच्या संगनमताने खोटा गुन्हा नोंद झाल्याने आता दलित संघटना या बाबत हायकोर्टात दाद मागणार आहेत. अशा आशयाचे 21 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर दलित संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रा. शरदचंद्र डोंगरे, डॉ.अशोक राऊत, प्रकाश आडगळे, किशन पाईकराव, रामकिसन खंदारे, चंदू गिरी, हरिभाऊ खंदारे, सीमा वानखेडे, प्रल्हाद नवसागरे(ता.अध्यक्ष, वंचित आघाडी) मनोज कांबळे, गणेश पाईकराव, श्याम कांबळे, भीमराव कोकणे, अशोक राऊत ( हिवरी), आर. एस. मोरे, ए. जी. गायकवाड, कविता बेंद्रे, सुमन दलशिंगारे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button