Uncategorized

मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा उमरखेड शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशतर्फे संपूर्ण राज्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी उमरखेड शहराच्या वतीने इंदुदत्त हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर महारक्तदान संकल्प शिबिर आमदार किसनराव वानखेडे, जिल्हा नितीन समन्वयक आमदार नामदेव ससाने भुतडा, माजी यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडले. तसेच या वेळी जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी रक्तदान केले. या उपक्रमाला कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे रक्तदान शिबीर हा एक आदर्श उपक्रम ठरला असून, देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यात योगदान देण्याचा एक प्रेरणादायी संदेश या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. या वेळी आमदार किसनराव वानखेडे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार नामदेव ससाने, जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर, ज्येष्ठ नेते दिलीप सुरते, सुरेश काळे, अॅड अनिल माने, बळवंतराव नाईक, भाजपा तालुका अध्यक्ष विठ्ठल वानखेडे, पुंडलिक कुबडे, जितेंद्र पवार, गजेंद्र मार्कन्डे, शिवा कलोसे, अरविंद भोयर, शहराध्यक्ष अतुल खंदारे, युवा मोर्चा अध्यक्ष पवन मेंढे, प्रदीप शेरे, अमोल तीवरंगकर, शेखर तीवरंगकर, महावीर महाजन, किशोर तिवारी, अश्विन टाक, विशाल कदम, बाळा दुधेवार, संतोष लुटे, गजानन जगताप, संतोष आलट, कृष्णा साबळे, या सह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button