Uncategorized

गुलाबसिंग रूडे नगरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड नगर परिषद हद्दीतील गुलाबसिंग रूडे नगर (बंजारा तांडा) परिसरातील नागरिक विविध मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. घरकुल योजना, रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सुविधांची दुरवस्था असून अनेक वृद्ध महिला अद्यापही निराधार योजनेपासून वंचित आहेत.

स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करूनही योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार केली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या व्यथा शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या या समस्या ऐकून घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्या गांभीर्याने घेतले असून स्थानिक तसेच जिल्हा स्तरावर पाठपुरावा करून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीत शहरप्रमुख अॅड. संजीवकुमार जाधव, माजी उपजिल्हा प्रमुख कैलासभाऊ कदम, महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी, भोसलेताई, उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख राजू गायकवाड, दामोदर इंगोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button