Uncategorized

उमरखेड येथे शिवसेना व रिपब्लिकन सेना युतीचा जल्लोष

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणित जुळवत मोठा डाव खेळला आहे. शिंदे यांची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये युती झाली असुन महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात या युतीमुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचे पालकमंत्री संजूभाऊ राठोड व रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर एकत्र आल्याने जिल्ह्यातील समिकरण नक्कीच बदलणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. युतीची अधिकृत घोषणा मुंबई येथे बुधवारी १६ जुलै दुपारी १ वाजता संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मराठी आणि दलित मताच्या एकत्रीकरणासाठी रिपब्लिकन सेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याने आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती च्या निवडणूकीत दोन्ही पक्षाला मोठा फायदा होणार आहे. राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेनेने आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मोठ्या शहरा बरोबरच यवतमाळ मध्ये ही मराठी दलीत मतांची संख्या निर्णायक आहे. यवतमाळ जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांचे काम प्रभावी असुन त्यांनी दलीतांच्या न्याय हक्कासाठी प्रशासना विरोधात मोठी आंदोलने केली आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे समाजाचे निर्णायक मत आहेत. तर दुसरीकडे कडे शिवसेनेचे पालकमंत्री संजूभाऊ राठोड हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे व गोर गरीबांना करत असलेल्या मदतीने महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या झोतात आहेत. यवतमाळ जिल्ह्यात या युतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये नक्कीच फायदा होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. उमरखेड येथे शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या वतीने माहेश्वरी चौकामध्ये फटाके फोडून नारे देत युतीचा जल्लोष साजरा केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख चितांगराव कदम, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता. उपाध्यक्ष भीमराव खंदारे, राजू आगीरे, गजानन भोयर, भावराव भोयर, राहुल नवसागरे, नंदू इटकरे, संदीप राऊत, देवराज गोडबोले, साहेबराव कदम, माधव मेळेगावकर, कुंदन कदम, हजानं नवसागरे, प्रकाश पोपुलवाड, विष्णू काळबांडे तसेच शिवसेना शहर प्रमुख ॲड. संजिवकुमार जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख कैलास कदम, उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर, प्रवीण मिराशे, संदीप ठाकरे, गजू सोळंके, राजू गायकवाड, वसंता देशमुख, दामोदर इंगोले, सचिन दवणे, देवबन गोस्वामी तसेच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button